Bihar Mobile Phone Thief : खिडकीतून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, प्रवाशांनी चोराला पकडून ठेवलं

बिहारच्या बेगुसरायमध्ये धावत्या रेल्वेच्या खिडकीतून मोबाइल चोरणे एका चोराच्या चांगल्याच जीवावर आले. या चोराने स्थानक सोडणाऱ्या रेल्वेच्या खिडकीतून एका प्रवाशाचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. पण सावध असणाऱ्या प्रवाशाने झटकन त्याचा हात पकडला व त्यानंतर जे झाले ते व्हिडिओत दिसत आहे. या चोराचा दुसरा हात अन्य एका प्रवाशाने पकडून ठेवला. यावेळी रेल्वे स्थानकाबाहेर गेली व चोर तसाच खिडकीला लटकत राहिला. जवळपास 15 किमीपर्यंत प्रवाशांनी त्याला त्याच स्थितीत लोंबकळत ठेवले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola