Conversion Racket: Beed मध्ये १०० जणांच्या धर्मांतराचा प्रयत्न, 'तुमची संस्था आहे का?'

Continues below advertisement
बीड (Beed) जिल्ह्यातील वडवणी (Wadwani) शहरात जवळपास १०० लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वडवणी पोलिसांनी (Wadwani Police) चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. 'अनेक दिवसापासून हे तुम्ही करत असाल तर तुमची संस्था आहे का?', असा सवाल करत स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि हिंदू संघटनांनी हा प्रकार उधळून लावला. वडवणी शहरातील कानपूर रस्त्यालगत असलेल्या एका सभागृहात रविवारच्या दिवशी इतर धर्मातील महिला-पुरुषांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले जात असल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फादर दिनेश लोंढे यांच्यासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले. संपूर्ण चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola