Special Report ATAGS : DRDO ची 'अडवांस्ड तोफ', 48 KM मारा, परदेशातूनही ऑर्डर!
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने 'अडवांस्ड तोड आर्टिलरी गन सिस्टम' (ATAGS) या तोफेची निर्मिती केली आहे. ही तोफ भारतीय संरक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानली जात आहे. ATAGS ही जगातील अशा तोफांपैकी एक आहे, जी कमी वेळात विकसित झाली आहे. या तोफेचा मारा 48 किलोमीटरपर्यंत आहे. सध्या उपलब्ध असलेल्या दारुगोळ्याचा वापर करूनही ही तोफ 48 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. या तोफेत एका वेळी सहा ते आठ दारुगोळे टाकले जातात आणि फायरिंगची प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. यामुळे फायरिंगसाठी लागणारा वेळ वाचतो. या तोफेची अचूकता खूप चांगली आहे. भविष्यात या तोफेची रेंज वाढवण्यासाठी लेजर गाईडेड, रामजेट आणि आयएनजीपीएस (INS/GPS) या प्रणालींचा वापर केला जाणार आहे. रामजेट तंत्रज्ञानामुळे या तोफेची रेंज 80 ते 90 किलोमीटरपर्यंत वाढवता येईल. 'जगात अशी कुठलीही गन नाही जी या एवढ्या रेंजपर्यंत फायर करू शकेल,' असे सांगण्यात आले आहे. या तोफेची वाळवंटात आणि उंच ठिकाणीही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या तोफेच्या निर्मितीला दहा वर्षे लागली आहेत. आयएनएस (INS) आणि लेजर इग्निशन प्रणाली विकसित होण्यास पाच ते सहा वर्षे लागतील, तर रामजेट प्रणालीसाठी आणखी दोन ते तीन वर्षे लागतील. या तोफेची प्रगत वैशिष्ट्ये पाहून देशातूनच नव्हे, तर परदेशातूनही ऑर्डर्स येत आहेत.