Solapur- Tuljapur Highway: टॅंकरचा अपघात, गोडेतेल पळवण्यासाठी नागरीक घागर घेऊन रस्त्यावर ABP Majha
Continues below advertisement
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील सांगवी गावाजवळ गोडेतेलाच्या टँकरचा अपघात झालाय. टायर फुटल्यानं टँकर उलटला. त्यानंतर टँकरमधून गोडेतेलाच्या धारा लागल्या. हे पाहून घागरी, डबे आणि मिळेल ते साहित्य घेऊन तेलासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली. त्यावेळी पोलिसांनी प्रशासनानं लोकांना पांगवले. राजकोटहून हा टँकर बंगळुरुच्या दिशेनं निघाला होता. या टँकरनंतर इथेच उसाच्या ट्रॅक्टरचाही अपघात झाला. ट्रॉलीचा सेंटर बोल्ट तुटल्यानं अपघात झाला. अपघातामुळे सर्व ऊस रस्त्यावर पडला होता. सुदैवानं त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महामार्गावरील दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला. तरी, अपघातग्रस्त वाहनांना दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे.
Continues below advertisement