Navneet Rana : 'ये तो झांकी है, पिच्चर पुरी बाकी है' नवणीत राणांचा ठाकरेंवर हल्ला

मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडलीय. ये तो झाकी है, पिक्चर पुरी बाकी है, असं म्हणत खासदार नवनीत राणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. काल त्या जळगावात बोलत होत्या. लव जिहादच्या विरोधातील लढ्याला जळगाव शहरातून सुरुवात करणार असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या. जळगाव शहरातील एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमासाठी खासदार नवनीत राणा जळगावात आल्या होत्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola