Laxman Hake OBC Protest : ओबीसींचा सरकारला इशारा, दसऱ्यानंतर मुंबईत मोर्चा

कळमनुरी येथे आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर (GR) तात्काळ रद्द करावा, ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी सरकारला थेट इशारा दिला. "आमच्या अनेक पिढ्यांचं शोषण तुम्ही केलं. आता जीआर रद्द केला नाही तर दसऱ्यानंतर मुंबईला निघू. मुंबईतील एकही रस्ता रिकामा राहणार नाही," असे हाके म्हणाले. जर सरकारने जीआर रद्द केला नाही, तर मुंबईत दहा दिवस आंदोलन चालेल आणि महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागीर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola