Ashok Saraf Speech in Maharashtra Bhushan : 'महाराष्ट्र भूषण' मिळाल्यानंतर अशोक सराफ यांचं भाषण
Ashok Saraf Speech in Maharashtra Bhushan : 'महाराष्ट्र भूषण' मिळाल्यानंतर अशोक सराफ यांचं भाषण रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन ही तिन्ही माध्यमं आपल्या सशक्त अभिनयानं गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राज्य शासनाच्या महाराष्ट्रभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं आज गौरवण्यात आलं. मुंबईतल्या वरळी येथील एनएससीआय डोममध्ये झालेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. अशोक सराफ यांनी आजवरच्या कारकीर्दीत तीनशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांसह अनेक मराठी नाटकं आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्यांच्या या प्रदीर्घ कारकीर्दीचा राज्य शासनाकडून महाराष्ट्रभूषण पुरस्कारानं यथोचित गौरव करण्यात आला.