Ashok Muley : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंचा माझा पुरस्कार सोहळा

Continues below advertisement

Ashok Muley : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंचा माझा पुरस्कार सोहळा मुंबई, बुधवार - ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या संकल्पना असलेला माझा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. अभिनेता भरत जाधवला 'पहिला भरतरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते भरत जाधवला गौरवण्यात आलं. नाट्यशास्त्राचे प्रणेते भरतमुनी यांच्या योगदानाचा गौरव म्हणून यावेळपासून भरतरत्न पुरस्कार देण्याचं मुळ्येकाकांनी निश्चित केलंय. याशिवाय सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता - वैभव मांगले भार्गवी चिरमुले, आदिती सारंगधर, स्वप्निल जाधव रणजित पाटील, संकर्षण कऱ्हाडे, गौतमी देशपांडे, आशुतोष गोखले, सलोनी सुर्वे आदींनाही यावेळी गौरवण्यात आलं. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, ज्येष्ठ वृत्तनिवेदिका मंजिरी मराठे आदी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी हिंदी-मराठी गीतांची खास मैफलही सादर करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram