Ashok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणी

Continues below advertisement

Ashok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणी

बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपास सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने (Walmik karad) सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटकही केली आहे. 

दरम्यान, या प्रकरणात केज कोर्टात आज सुनावणी करण्यासाठी सीआयडी तर्फे विनंती केली असता, न्यायालयाने ही विनंती मान्य केली आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडसाठी आजचं केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.  संध्याकाळी  7.30 नंतर सुनावणीसाठी सीआयडीने विनंती केली होती. या विनंतीला न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय सुनावणी होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करा, अशी खळबळजनक मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram