Ashok Chavan | ...तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांचा इशारा
जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरं झालं पण कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.