Nana Patole Nanded : आचारसंहिता लागल्यावर भाजपमध्ये गेलेले परत येणार : नाना पटोले
Nana Patole Nanded : आचारसंहिता लागल्यावर भाजपमध्ये गेलेले परत येणार : नाना पटोले
अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काॅग्रेसकडून नांदेडमध्ये नव्यानं मोर्चेबांधणी. आमदार मोहन हंबर्डे, जितेश अंतापुरकर आणि माधवराव जवळगांवकर या तिन्ही आमदारांसोबत नांदेड मधील पदाधिकारी आज काॅग्रेस भवनात.
नांदेड मधील अनेक नगरसेवक काॅग्रेस मधून भाजप मध्ये गेलेत. नगरसेवक,नेते गेलेत तरी मतदारसंघ काॅग्रेसच्या विचारांचा आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले आमदार म्हणून पहिले काही दिवस चलबिचल झाली- नंतर मात्र आढावा घेतला आणि नांदेड हा काॅग्रेसचाच गड असल्याचं जाणवलं. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काॅग्रेसच्या पदाधिका-यांमध्ये थोडी अस्वस्थता आली मात्र आता वाटतंय की सर्व काही एकाच व्यक्तीजवळ केंद्रीत होण्यापेक्षा आता सर्वांना समान संधी मिळेल.