Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांसोबत 18 ते 20 आमदार भाजपासोबत जाण्याची शक्यता
Continues below advertisement
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांसोबत 18 ते 20 आमदार भाजपासोबत जाण्याची शक्यता
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. आता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे मराठवाड्यातील आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी पत्रकारपरिषद घेत स्पष्टीकरण दिले. मी आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही. कोण काय करेल, ते मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझे बोलणे झालेले नाही, असे चव्हाण यांनी म्हटले.
Continues below advertisement