Mumbai : मुंबईच्या नालेसफाईवरून वादंग? Ashish Shelar यांचा आरोपांना Iqbal Chahal यांचं उत्तर
मुंबईतल्या नालेसफाईच्या कामावर भाजपनं कडाडून टीका केल्यानंतर आज पालिका प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी केली. मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून दर पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून नालेसफाईची कामं हाती घेतली जातात. यंदा नालेसफाईच्या कामांना 15 दिवस उशीरानं सुरुवात झाली. त्यानंतर भाजपनं मुंबई पालिकेवर टीका केली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या पाहणीनंतर आज इक्बाल चहल यांनीही पाहणी केली. यंदाच्या नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिली असून दुप्पट वेगानं कामाचे आदेश दिल्याचं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलंय.
Tags :
Abp Majha Ashish Shelar Iqbal Singh Chahal ABP Majha Mumbai Drain Cleaning Abp Maza Live ABP Majha Mumbai Sewage