Ashish Deshmukh On Chhagan Bhujbal : भुजबळ- शरद पवार भेटीवर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Ashish Deshmukh On Chhagan Bhujbal : भुजबळ- शरद पवार भेटीवर आशिष देशमुखांची प्रतिक्रिया

मराठा व ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडण्यासाठी राज्यातील जेष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा हे सांगायला छगन भुजबळ पवारांना भेटले असेल तर हे स्वागतहार्य आहे. असे मत भाजपच्या ओबीसी सेल चे प्रभारी आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पण पुढाकार द्यायला हवा अशी विनंती आशिष देशमुख यांनी केली. त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी..

ही बातमी पण वाचा

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : छगन भुजबळ - शरद पवार भेटीने आगामी राजकारणाची गणितं बदलणार ?

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात एक वेगळं वळण निर्माण करेल अशी घटना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला गेले आणि सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटेन, राहुल गांधींना (Rahul Gandhi) देखील भेटेन असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी स्पष्ट केलं आहे. 

राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत

 छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर छगन भुजबळ पुन्हा स्वगृही येणार की छगन भुजबळ अजित पवारांचा काही निरोप घेऊन गेलेत? अशी चर्चा दुपारपर्यंत राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. दरम्यान, छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नांसदर्भात पवारांना भेटलो असं स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत.  मात्र, शरद पवारांना मी राजकीय विषयासंदर्भात भेटायला गेलो नव्हतो. राज्यात सध्या मराठा समाज ओबीसी समाजाच्या लोकांकडे जात नाही आणि ओबीसी समाजातील लोक मराठा समाजाच्या लोकांकडे जात नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे शरद पवारांसोबत या प्रश्नावर चर्चा केल्याचे भुजबळ म्हणाले. 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram