Asha Bhosale : 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

Continues below advertisement

Asha Bhosale : 'स्वरस्वामिनी आशा'  पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि  दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी  भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार  आशिष शेलार यांनी काही प्रसंग सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले.

आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात म्हटले की,  आजच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, आशाताई, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. इतकं मोठं मंच आता जगात कुठेच नसेल. हा अद्वितीय कार्यक्रम  असून मला मंचावर बसण्याची संधी मिळाली आहे.

आमच्या विचारांचं दैवत म्हणजे भागवत जी आणि सुरांची देवता म्हणजे आशाताई आहे, त्यांच्यासोबत  मंचावर बसण्याची संधी मिळाली यापेक्षा दुसरं सुख नाही असे शेलार यांनी म्हटले.  शेलार यांनी सांगितले की, हे पुस्तक तुम्हाला समाधानही देईल. या पुस्तकात चाटूगिरी नाही. हे पुस्तक अमूल्य ठेवा आहे. वैचारिक अधिष्ठान असल्याचे शेलार यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram