Asaduddin Owaisi : '18 वर्षाचे पुरूष आणि स्त्रिया पंतप्रधान निवडू शकतात तर लग्न का करु शकत नाही'?

Continues below advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळाने मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनातच मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्यासाठी दुरुस्ती विधेयक आणू शकते, अशी अपेक्षा आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मुलींच्या लग्नाच्या वयावर वाद सुरू झाला आहे. त्याचबरोबर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मोदी सरकारने महिलांचे लग्नाचे वय 21 वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. हीच पितृसत्ता आम्हाला सरकारकडून अपेक्षित आहे. 18 वर्षांचे पुरुष आणि स्त्रिया करारावर स्वाक्षरी करू शकतात, व्यवसाय सुरू करू शकतात, पंतप्रधान निवडू शकतात आणि खासदार आणि आमदार निवडू शकतात पण लग्न करू शकत नाहीत?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram