Gunshot Attack on Asauddin Owaisi असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक,शस्त्र जप्त
Continues below advertisement
Uttar Pradesh Meerut : एमआयएमचे MIM अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींवर Asaduddin Owaisi गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आलंय. असदुद्दीन ओवेसींच्या वक्तव्यामुळं नाराज झाल्यानं गोळीबार केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती मिळतेय. दरम्यान या प्रकरणाची मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारनं स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. काल प्रचार आटपून दिल्लीतल्या घराकडे निघालेल्या असदुद्दीन ओवेसींवर मेरठमधल्या टोल नाक्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या नंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली.
Continues below advertisement