Arvind Kejriwal Jail : मी पुन्हा जेलमध्ये चाललो, कधी परतणार सांगता येत नाही ABP Majha

Arvind Kejriwal Jail : मी पुन्हा जेलमध्ये चाललो, कधी परतणार सांगता येत नाही ABP Majha

Delhi Chief Minister Arvind Kejriwal Released Video: नवी दिल्ली : दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) 2 जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ जारी करून जनतेशी संवाद साधला आहे. "मी कुठे असीन, आत किंवा बाहेर, दिल्लीचं काम थांबणार नाही.", असं व्हिडीओमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. तसेच, हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय, असंही केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत. 

दिल्लीचे मुख्यमंत्र अरविंद केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, "मला सर्वोच्च न्यायालयात प्रचारासाठी 21 दिवसांची परवानगी देण्यात आली होती. उद्या 21 दिवस पूर्ण होत आहेत. मला परवा आत्मसमर्पण करावं लागेल. मी परवा तुरुंगात जाईन. या वेळी हे लोक मला किती दिवस तुरुंगात ठेवतील माहीत नाही, पण माझी एक गोष्ट ऐका की, देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola