Corona Help : धक्कादायक! 50 हजारांचं सानुग्रह अनुदानासाठी प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा दुप्पट अर्ज
औरंगाबाद : कोरोनामुळे ( Corona) मृत्यू झाल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 50 हजार ( government assistance scheme ) रूपये मदत म्हणून दिले जात आहेत. परंतु, या मदतीसाठी एका मृत व्यक्तीच्या कुटुंबातील चार सदस्यांनी वेगवेगळे अर्ज केल्याचे समोर आले आहे. 50 हजारांच्या मदतीसाठी मृताचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे कोणाचा अर्ज ग्राह्य धरून मदत करायची हा प्रश्न पालिकेसमोर पडला आहे.
कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 50 हजार रूपये मदत म्हणून दिले जातात. ही रक्कम मिळवण्यासाठी मृताच्या कुटुंबाने कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर माहितीची खातरजमा करून मृताच्या कुटुंबाला 50 हजार रूपये मिळतात. परंतु, औरंगाबादमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे पालिकाही संभ्रमात पडली आहे.