Appasaheb Dharmadhikari Speech Maharashtra Bhushan:उत्तराधिकाऱ्याची घोषणा, आप्पासाहेबांचं भाषण LIVE

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आलंय. हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हजारो श्रीसेवक उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसेवक उपस्थित असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यानंतर पुरस्काराला उत्तर देताना आप्पासाहेब बोलत होते.नानासाहेब धर्माधिकारी हे वयाच्या 87 वर्षापर्यंत काम करत होते.  मी देखील माझा श्वास असेपर्यंत समाजसेवेचं काम सुरु राहणार आणि माझ्यानंतर सचिन धर्माधिकारी सुद्धा चांगले काम करत आहेत असे धर्माधिकारी म्हणाले. काम उत्तम असेल तर सन्मान होतोच शिवाय हा पुरस्कार नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी आहे. नानासाहेबांनी मोठं कष्ट केलेत आणि किर्ती वाढवण्यासाठी मेहनत करावी लागेल असे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणालेत. पुरस्काराचे मिळालेले 25 लाख रुपयांचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर देखील केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola