Sanjay Raut Rokhthok : कुटुंबाला टार्गेट केलं जातं असल्याचं पवार म्हणाले, राऊतांचा 'रोखठोक'मधून दावा
Sanjay Raut Rokhthok : कुटुंबाला टार्गेट केलं जातं असल्याचं पवार म्हणाले, राऊतांचा 'रोखठोक'मधून दावा
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मंगळवारी सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठा खुलासा केलाय. भाजपसोबत जाण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीवर दबाव आणला जातोय. कुणाला त्यांच्यासोबत जायचं असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. पण राष्ट्रवादी पक्ष म्हणून कुणासोबत जाणार नाही, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. संजय राऊतांनी रोखठोकमध्ये केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडालीये. शरद पवार यांचा रोख अजित पवार यांच्या दिशेने तर नाही ना अशीही चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोकमधून हा दावा केलाय.