Gokul Milk | गोकुळच्या सभेतली गोंधळाची परंपरा पाहता यंदाही खुर्च्या बांधून ठेवल्या
Continues below advertisement
एक वेळेस आमदारकी नको पण गोकुळ दूध संघाचे संचालक पद द्या, अशी म्हण पश्चिम महाराष्ट्रा मध्ये गेले अनेक वर्षे रूढ झालेली आहे. याला कारणही तसंच आहे. संपूर्ण राज्याला गाय आणि म्हैशीचं सकस दूध पुरविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील बलाढय गोकुळ दूध संघ म्हणजे लक्ष्मी लाभ आणि राजकारणातील उत्कर्ष . विविध राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा डोळा असणाऱ्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न होत आहे. या सभेसाठी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ आली आहे. थोड्याच वेळात गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर होणारी सभा वादळी होण्याची शक्यता आहे. सभेच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Continues below advertisement
Tags :
Gokul Election 2021 Gokul Milk Producers Gokul Gokul Milk General Meeting Gokul Milk Association