Thane Basri Festival: 2 वर्षांनंतर वार्षिक बासरी उत्सव, पंडित हरिप्रसाद चौरसीयांची उपस्थिती ABP Majha
कोविड साथरोगाच्या टाळेबंदीमुळे गेली दोन वर्षे साजरा होवू न शकलेला बहुप्रतीक्षित वार्षिक ‘बासरी उत्सव’ आता यंदा पुन्हा सक्सार6 झाला. या उत्सवाचे १३ वे पर्व ठाणे येथे पार पडले. भारतीय स्वातंत्र्यांच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवाला हा बासरी उत्सव समर्पित करण्यात आला. यावेळी प्रख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसीया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसीया जीवनगौरव पुरस्कार हा प्रख्यात सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांनी प्रदान करण्यात आला. बासरी वादक विवेक सोनार यांच्या गुरुकुल प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्कार देण्यात येतो याच महोत्सवात सादर झालेल्या ‘फ्लूट सिम्फनी’मध्ये बासरीवादक विवेक सोनार यांच्या नेतृत्त्वाखाली ७५ बासरीवादक सहभागी झाले आणि त्यांनी देशाचा अमृत महोत्सव आगळ्या पद्धतीने साजरा केला. या ‘फ्लूट सिम्फनी’मध्ये १६ वर्षांखालील १५ बासरीवादक आणि १५ महिला बासरीवादक सहभागी झाले होते.