Konkan Railway On Ganeshotsav : कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांची घोषणा
रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांची घोषणा केलीय. त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांना आता आणखी रेल्वेगाड्यांचा पर्याय उपलब्ध झालाय. मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेकडूनही विशेष रेल्वेगाड्या कोकणात धावणार आहेत. गुजरातमधील उधना ते मडगाव, अहमदाबाद कुडाळ तसेच उधना ते मंगळुरूदरम्यान या चार गाड्या धावणार आहेत.तसंच कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी या आधी दोनशेहून अधिक फेऱ्यांची घोषणा करण्यात आलीय. यासंदर्भात विशेष गाड्यांच्या सविस्तर माहितीसाठी कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.
Tags :
Konkan Ahmedabad Western Railway Ganeshotsav Konkan Railway Announcement Railway Administration Kudal Ganpati Special Mumbai Route Option Of Trains Udhna To Margaon