Pune Land Scam : अंजली दमानिया पत्रकार परिषदेत मुंडवा जमीन प्रकरणासंदर्भात खुलासे करणार

Continues below advertisement
आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली असून, निवडणुका एकत्र लढवण्यावर भर देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेतली असून, मुंडवा जमीन घोटाळ्याप्रकरणी (Mundhwa Land Scam) मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 'माझ्याबरोबर पुण्याहून आलेले सगळे गायकवाड कुटुंबातली अनेक लोकं होती, त्यांनी दिलेले पेपर्स देखील मी बावनकुळेंना दाखवले, त्याच्यात त्यांचे जुने म्हणजे 1932 मधली महार वतनाची सनत आहे', असे अंजली दमानिया म्हणाल्या. या भेटीत त्यांनी घोटाळ्यासंबंधी काही कागदपत्रे बावनकुळे यांना सादर केली असून, उद्याच्या पत्रकार परिषदेत त्या काय खुलासा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola