Anjali Damania : 5 आमदार बाद होणार आणि Ajit Pawar भाजपसोबत जाणार - दमानिया
अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीवरून चर्चा रंगलेली असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक ट्वीट करत नव्या चर्चेचा धुरळा उडवत, नवा बॉम्ब टाकलाय. १५ आमदार बाद होणार असून अजित पवार हे भाजपसोबत जातील असं खळबळजनक ट्वीट अंजली दमानिया यांनी केलंय. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ही माहिती मंत्रालयातील एका व्यक्तीने दिल्याचा दावा दमानियांनी केलाय. त्याचसोबत, बघू आणखी किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची... असं सूचक वक्तव्यही त्यांनी ट्विटरवरून केलंय.
Tags :
Meeting Anjali Damania Discussion Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Eknath Shinde 15 MLAs Expelled Sensational Tweet