Anjali Damania : Laxman Hake आणि Walmik Karad यांचे एकत्र जेवतानाचे फोटो, अंजली दमानियांकडून ट्विट

Continues below advertisement

Anjali Damania :  Laxman Hake आणि Walmik Karad  यांचे एकत्र जेवतानाचे फोटो, अंजली दमानियांकडून ट्विट

मी संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करत नाही. पण आम्हाला मंत्री होता येत नाही, खासदार-आमदार होता येत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी माणसं तिकडे हवी आहेत. तुम्ही त्यांनाच गुन्हेगार ठरवत आहात. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून स्वत:च्या फायद्याचे राजकारण करु पाहत आहेत. ते एका समाजाविरोधात गरळ ओकत आहेत, मोर्चे काढत आहेत. ते जाणीवपूर्व धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट करत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेवेळी बोलत होते.

यावेळी लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप केला. तसेच वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याची बाब हाके यांनी अधोरेखित केली. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत. अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिक अण्णा चालतो, वाल्मिक अण्णांची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ करायला चालतात. निवडणूक जिंकायला सगळ्यांना वाल्मिक अण्णा चालतात, या गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. निवडणुकीत त्यांच्या स्कीलचा उपयोग करुन घेतला जातो आणि आता लक्ष्य करण्यासाठी तुम्हाला फक्त  धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दिसतात. या माणसांना अडकवले जात आहे. या गोष्टी ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram