Pune Land Scam: 'अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा', Anjali Damania यांची मागणी

Continues below advertisement
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी मुनह्वा जमीन घोटाळ्याच्या (Mundhwa Land Scam) निष्पक्ष चौकशीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पार्थ पवार (Parth Pawar) यांना सर्व माहिती होती आणि त्यांच्या अमेडिया कंपनीला (Amedia Enterprises) व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे. दमानिया म्हणाल्या, 'हे जे केलेलं आहे, ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे'. शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) यांच्याकडे असलेली पॉवर ऑफ ॲटर्नी नोंदणीकृत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या सुमारे ६९ कंपन्या असून त्यातील जमिनींच्या व्यवहारांचे खुलासे करणार असल्याचेही दमानिया यांनी जाहीर केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola