Anjali Damania PC Pune Land Scam 'अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा',दमानियांची मागणी
Continues below advertisement
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर पुण्यातील जमीन व्यवहारावरून (Pune Land Deal) गंभीर आरोप केले आहेत. बनावट पॉवर ऑफ अटॉर्नीच्या (Power of Attorney) आधारे अमेडिया एंटरप्रायझेस (Amedia Enterprises) कंपनीने केलेल्या या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा दावा करत, दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, 'माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदापासून आणि पालकमंत्रीपदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा'. या प्रकरणात कायद्याचे उल्लंघन झाले असून, एफआयआरमध्ये (FIR) पार्थ पवार यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, हा व्यवहार रद्द करण्याचा सरकारचा प्रयत्न बेकायदेशीर असून, तो केवळ दिवाणी न्यायालयच (Civil Court) करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement