ViralVideo: 'साप पकडतानाच हाताला चावला', प्राणीमित्र Sameer Ingale यांचा सर्पदंशाने मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद

Continues below advertisement
अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील सावेडी (Savedi) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सर्पमित्र समीर इंगळे (Sameer Ingale) यांचा साप पकडण्याच्या प्रयत्नात सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. साप पकडताना त्यांच्या हाताला साप चावल्याचा एक थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे. सावेडी भागात साप दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर समीर इंगळे नेहमीप्रमाणेच मदतीसाठी पोहोचले होते. साप पकडण्याचा प्रयत्न करत असताना, सापाने त्यांच्या हाताला दंश केला. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. समीर इंगळे हे शहरात एक परिचित आणि अनुभवी प्राणीमित्र म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या अनपेक्षित निधनामुळे संपूर्ण परिसरात आणि प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola