Pune Land Scam: उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे पुत्र Parth Pawar यांच्या कंपनीवर दोन गुन्हे, मुंढवा व्यवहार रद्द
Continues below advertisement
पुण्यात (Pune) जमीन घोटाळ्याच्या (Land Scam) आरोपांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) चर्चेत आहेत. पार्थ पवारांच्या कंपनीवर मुंडवा (Mundhwa) येथील ४० एकर आणि बोपोडी (Bopodi) येथील साडेपाच हेक्टर सरकारी जमीन मिळवल्याचा आरोप आहे. थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीचे जमीन घोटाळे उघड झाल्यानं अजित पवारच अडचणीत आले आहेत. मुंडवा येथील वादग्रस्त व्यवहार रद्द करण्यात आल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. तर बोपोडी प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह नऊ जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र पार्थ पवारांचे नाव एफआयआरमध्ये नाही. याशिवाय, बारामती तालुक्यातही अजित पवारांच्या हस्तकांनी मोठ्या प्रमाणात महार वतनाच्या जमिनी बळकावल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे (BSP) प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement