Anil Parab : भाजपवाले काय म्हणात म्हणून ही सभा घेतली नाही : अनिल परब ABP Majha
Continues below advertisement
मुंबई : मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा आहे आणि या सभेत त्यांच्या निशाण्यावर कोण-कोण असतील याची चर्चा सुरु झाली आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून महिनाभर सुरु असलेला वाद, हिंदुत्वावरून सुरु असलेली लढाई, भाजपकडून होणारे आरोप प्रत्यारोप आणि राणा दाम्पत्यानं दिलेलं आव्हान..... या सगळ्यांचा समाचार उद्धव ठाकरे आजच्या सभेत घेतील असे संकेत शिवसेनेनं आतापर्यंत जारी केलेल्या जाहिरातींमधून मिळाले आहेत. याशिवाय ओवैशींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं निर्माण झालेल्या वादावरही मुख्यमंत्री काय भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement