Anil Parab Speech : ठाकरे गटाकडूनही 'लाव रे तो व्हिडीओ', फुटलेल्या नेत्यांविरोधात परबांचे पुरावे!
Continues below advertisement
Anil Parab Speech : ठाकरे गटाकडूनही 'लाव रे तो व्हिडीओ', फुटलेल्या नेत्यांविरोधात परबांचे पुरावे! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 1999 पासून शिवसेनेकडून घटनादुरुस्ती सादर केली नसल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच नार्वेकरांकडून देण्यात आलेल्या निकालाची चिरफाड आज ठाकरे गटाकडून करण्यात आली. यावेळी जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकर यांनी नाकारली त्याच घटनादुरुस्तीला राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी थेट 2013 मधील ठराव आणि नार्वेकर उपस्थित असलेला व्हिडिओ सुद्धा यावेळी दाखवला.तसेच 2013 मध्ये शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक आणि कार्यकारिणीचे ठराव वाचून दाखवले.
Continues below advertisement