Anil Parab यांना ED नोटीस येणं अपेक्षित होत, सूडाचं राजकारण जनतेलाही कळतं:Chhagan Bhujbal

Continues below advertisement

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीची नोटीस आल्यानंतर सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली.  अनिल परबांना ईडी नोटीस येणं अपेक्षित होत, सूडाचं राजकारण जनतेलाही कळतं असे भुजबळ यांनी माझाशी बोलताना सांगितले. 

दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात समन्स बजावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अनिल परब यांना या प्रकरणी मंगळवाली ईडी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram