Anil Parab on Anil Parab : हे सरकार आल्यावर परमबिरसिंहांचं निलंबन मागे होणार हे अपेक्षितच होतं
Continues below advertisement
Anil Parab on Anil Parab : "हे सरकार आल्यावर परमबिरसिंहांचं निलंबन मागे होणार हे अपेक्षितच होतं"
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना दिलासा मिळालाय. शिंदे-फडणवीस सरकारनं यांचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीचं सरकार असताना परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. या निलंबनाला परमबीर सिंह यांनी आव्हान दिलं होतं. दरम्यान आता शिंदे - फडणवीस सरकारने त्यांच्यावरील आरोप वगळून डिसेंबर 2021 मध्ये जारी केलेलं निलंबन आदेशही मागे घेतलेत आणि निलंबनाचा कालावधी ऑन ड्युटी असल्याचं मानलं जावं, असं आदेशात म्हटलंय.
Continues below advertisement