Police Transfer : पोलीस बदल्यांवरून माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांचा Anil Parab यांच्यावर निशाणा
पोलिसांच्या बदल्या, सचिन वाझे आणि परमबीर सिंह यामुळे राज्यातलं आघाडी सरकार पुन्हा एकदा आरोपांच्या फेऱ्यात अडकलं आहे. सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दबाव होता असा जबाब माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ईडीला दिलीय. तर बदल्यांची अनधिकृत यादी अनिल परब घेऊन येत होते असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर केल्यानं महाविकास आघाडी पोलिसांच्या बदल्यावरून अडचणी वाढल्या आहेत.