Anil Deshmukh | एल्गार परिषदेचा तपास एनआयकडे देणं घटनाबाह्य; गृहमंत्री अनील देशमुख यांची टीका | ABP Majha
Continues below advertisement
राज्य सरकारला न सांगता भीमा कोरेगावचा तपास केंद्राकडे दिला जाणं, याचा अर्थ हा कुणाला तरी वाचवायचा डाव आहे; असा घणाघात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागणीनुसार भीमा-कोरेगाव हिंसाचाराची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत सुरू करण्याच्या दिशेनं राज्य सरकारने पाऊल टाकताच, केंद्रीय गृहमंत्रालयानं काल हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवलं. आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी केली. त्यामुळे सध्या केंद्र आणि राज्यात वादाची ठिणगी पडली आहे. याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुणालातरी वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवला असं म्हटलं आहे.
Continues below advertisement