Anil Bonde : जरांगे मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही;बोंडेंनी डिवचलं

Continues below advertisement

Anil Bonde : जरांगे मुख्यमंत्री झाले तरी सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही;बोंडेंनी डिवचलं

मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही.. कोणीही तशा वल्गना करू नये... भाजप नेते अनिल बोंडेंनी पुन्हा जरांगेंना डिचवलं...  राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणावरून रान पेटलेलं असतानाच भाजप नेते अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा डीवचलय.. मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सग्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही...कोणी तशा वलग्नाही करू नये असा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी केलाय...अमरावतीत भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती.. त्यावेळी अनिल बोंडे यांनी हे विधान केलंय...  रक्ताची नातं असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच.. ते ओबीसीमध्ये येणारच.. पण  सग्या सोयऱ्यांना मिळणार नाही.   मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली ते मुख्यमंत्री झाले तरी ते करू शकणार नाहीत...   कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत..  त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नये, समाजात फूट पाडण्याचं काम करू नये...यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram