Angarki Chaturthi 2022 : अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरं फुलली,निर्बंधमुक्तीमुळे भाविकांचा उत्साह
Continues below advertisement
बुलेटिनची सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या दर्शनानं.... आज अंगारकी चतुर्थी आहे.. कोरोना निर्बंधमुक्तीनंतर आलेली ही पहिलीच अंगारकी चतुर्थी असल्यानं आज सकाळपासूनच राज्यातल्या गणेश मंदिरांमध्ये लगबग पाहायला मिळतेय. मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात मध्यरात्री दीड वाजल्यापासूनच बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी सुरू करण्यात आलंय. तिकडे रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्यामधील महागणपतीचं दर्शन घेण्युासाठीही पहाटेपासून भक्तांनी रांगा लावल्या आहेत... पुण्याचं दगडूशेठ गणपती मंदीर, नागपूरचा टेकडी गणपती, या मंदिरात आज भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. निर्बंधमुक्तीमुळे आज भाविकांचा उत्साहही द्विगुणित झालाय.
Continues below advertisement
Tags :
Angarki Chaturthi Angarki Sankashti Angarki Chaturthi In Ganpatipule Angarki Chaturthi 2022 Angarki Sankashti Chaturthi 2022