Anganwadi Sevika Protest : अंगणवाडी सेविकांचं मोबाईल वापसी आंदोलन, शासनाने दिलेले मोबाईल नादुरुस्त
राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन केलं आहे. सेविकांनी कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे. राज्यात सध्या 2 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. यामधल्या 1 लाख 5 हजार 500 अगंणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत. मात्र हे मोबाईल वांरवांर नादुरुस्त होत असल्यामुळे नविन अॅप्लिकेशन काम करताना अडचणी येत आहेत. याचा निषेथ म्हणून राज्यभरातल्या अंगणवाडी सेविकांनी मोबाईस वापसी आंदोलन सुरू केलं आहे.