Anganewadi Bharadi Devi Yatra 2021 | आंगणेवाडीची यात्रा यंदा साध्या पद्धतीने होणार
कोकणातील आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पध्दतीने होणार आहे. यावर्षी फक्त आंगणे कुटुंबीयाच्या उपस्थितीत ही यात्रा संपन्न होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर आंगणेकुटुंबीयांव्यतिरिक्त इतर भाविकांना भराडी देवीच्या यात्रेचा मार्ग सील करण्याचे आदेश दिलेत.. दरवर्षी लाखो भाविक आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनासाठी येतात. पण यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भाविकांना यात्रेला जाण्यास प्रशासनाने मज्जाव केलाय. त्यामुळे मंदिर परिसरात पूर्णपणे शुकशुकाट पहायला मिळतोय.