Anganewadi Bharadi Devi Yatra 2021 | बाहेरील भाविकांना आंगणेवाडीत प्रवेशबंदी
कोकणातल्या प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडीदेवीची यात्रा यंदा साध्या पद्धतीने साजरी केली जातेय. दरवर्षी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावतात. सर्वसामान्य भाविकांसह राजकीय नेतेमंडळीही भराडी देवीच्या चरणी लीन होतात. मात्र यंदा कोरोनामुळे केवळ आंगणे कुटुंबीयांना परवानगी देण्यात आलीय. अन्य भाविकांना यात्रेत अथवा मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.