Tirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमी

Continues below advertisement

Tirupati Balaji Temple Stampede : तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, सहा भाविकांचा मृत्यू, 40 जखमी 

आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी आहेत. वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाली. हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत होते. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क इथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली आणि त्यात चार भाविकांचा मृत्यू झाला.  

दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते आज तिरुपतीला जाणार आहेत. मात्र नायडूंनी या चेंगराचेंगरीप्रकरणी अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. गर्दीच्या हिशेबाने व्यवस्था का केली नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram