Andheri Landslide : अंधेरीतील टेकडीवरुन कोसळली दरड, पाच घरांचं मोठं नुकसान ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Jul 2023 09:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai andheri landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दरड दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरामधून सोसायटीच्या पहिला मजल्यावरील चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या ढिगारा गेला. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.