Anant Gupte : वैफल्यग्रस्त भावनेतून अनंत गीतेंचं वक्तव्य, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर
रायगड : शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला, अशा घणाघातही त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीत केवळ तडजोड आहे, असंही अनंत गीते म्हणालेत.
अनंत गीते म्हणाले की, "दुसरा कोणताही नेता, त्याला जगानं कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरेच. महाविकास आघाडी ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय?"