ED च्या अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून आनंदराव अडसूळांची उच्च न्यायालयात याचिका

ED च्या अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आनंदराव अडसूळ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola