Anandacha Shidha राज्याच्या तिजोरीवर भार;आनंदाचा शिधा दिवाळीत नाही, गोरगरिबांना धक्का Special Report

Continues below advertisement
आनंदाचा शिधा योजना यंदाच्या दिवाळीत गोरगरिबांना मिळणार नाहीये. सरकारी तिजोरीवर येत असलेल्या ताणामुळे यंदा हा शिधा देता येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळे दोन हजार बावीस पासून सुरू झालेली ही महत्त्वाकांक्षी योजना आता गुंडाळली जात असल्याची चर्चा आहे. गेल्या गणेशोत्सवातही हा शिधा मिळाला नव्हता. या निर्णयामागे खरंच आर्थिक कारण आहे की अंतर्गत स्पर्धा, याची चर्चा सुरू झाली आहे. अतिवृष्टीने संकटात असलेल्या गोरगरिबांना आता या योजनेतून मिळणाऱ्या तेल, साखर, पोहे आणि मैद्याची आशाही सोडून द्यावी लागणार आहे. एका नेत्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, "निवडणूक सर्वो, मतदार मरो या तत्त्वानं काम करणाऱ्या सरकारनं आता आनंदाचा शिधा योजनेवर गदा आणली आहे." निधी नाही म्हणून की आणलेली योजना म्हणून ही योजना बंद केली जातेय, हा संशोधनाचा विषय असला, तरी आलिशान सरकार आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी देऊ शकत नसेल, तर मग या सरकारला काय म्हणावं, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola