ST Reservation Row | आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात मोर्चे, Banjara समाजाला विरोध

Continues below advertisement
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध मागण्यांसाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले आहेत. बंजारा समाजाला आदिवासी समाजामधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी भंडारा, गोंदिया आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाले. गोंदियामध्ये आदिवासी समाजाने हजारोंच्या संख्येने आक्रोश मोर्चा काढला. बुलढाण्यामध्येही आदिवासी बांधवांनी विशाल मोर्चाचे आयोजन केले होते. भंडारा, नांदेड, गोंदिया आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघाले. बंजारा समाज या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर आला होता. नांदेडमधील मोर्चाची आणि आंदोलनाची दृश्ये ड्रोनच्या सहाय्याने टिपण्यात आली आहेत. राज्यभरातील आदिवासी समाज सध्या रस्त्यावर उतरला आहे. मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola