Amravati : कश्मीर फाईल्स सिनेमावरून अमरावतीत दोन गटांत हाणामारी, 15 तरुणांना अटक

कश्मीर फाईल्स सिनेमावरून अमरावतीत दोन गटांत वाद आणि हाणामारी झाली. कश्मीर फाईल्स चित्रपट पाहून आल्यानंतर दोन गटांतील लोक एकमेकांना भिडले. आझाद नगर इथं आल्यानंतर एका गटानं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्याला दुसऱ्या गटाकडून विरोध झाला. त्यामुळे दोन्ही गटांत वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली. गस्तीवरच्या पोलिसांनी याची दखल घेत दोन्ही गटांतील 15 तरुणांना अटक केली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola