Amravati अमरावती तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे नौका बुडाली, नौका दुर्घटनेत 11 जण बुडाल्याची भीती
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामधील तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र झुंज येथे अनेक भक्तगण दर्शनसाठी तर काहीजण दशक्रिया पार पाडण्यासाठी येत असतात. आज सकाळी एकाच नात्यातील तीन कुटुंब दशक्रिया पार पाडण्यासाठी आले असता या तीन कुटुंबातील अकरा सदस्य वर्धा नदीत होडी उलटल्याने बुडाल्याची घटना घडली. यात तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. अजून आठजण बेपत्ता असून त्यांचं शोधकार्य सुरू आहे. या शोध कार्यासाठी तालुका प्रशासनातील सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच आमदार देवेंद्र भुयार घटनास्थळावर दाखल आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने युद्धस्तरावर बचाव कार्य सुरू आहे. अमरावती जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. वरुड तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.
Continues below advertisement